नवरा बायको मराठी जोक्स | Marathi Jokes

नवरा बायको ट्रोल

सुरवी संसाराच्या दोन गोष्टी

१. बायको बोलत असताना शांत रहा .

२. बायको शांत असताना बोलू नका . 

सुरवी संसाराच्या दोन गोष्टी १. बायको बोलत असताना शांत रहा . २. बायको शांत असताना बोलू नका .



बायकोला बोललो ... आता नवरात्रीत देवीला गेलीस ना की फक्त देवीचा नुसता साज शृंगार पाहू नको... तिचे हात पण पहा.. आठ आठ हात असूनही एका तरी हातात मोबाईल आहे का...??? नाहीतर तु...! 😛😜 😂 बायकोचे उत्तर ... अहो, तुम्ही विष्णूची मूर्ती पहा. त्यालाही आठ हात आहेत! पण एकाही हातात "ग्लास" नाही !
😀😀😀😀
😄😳😳 😝😝😅🤪😅😄😅😄😅😳😅😳

वकील : हत्येच्या रात्री तुमच्या पतीचे अंतिम शब्द पत्नी : माझा चष्मा कुठे आहे नीलिमा . वकील: मग यात ठार मारण्यासारखी काय गोष्ट होती बायको : माझं नाव मीनल आहे.


नवरा सुधारायची सर्वात सोप्पी आयडिया... . . . . . . . . . . . . . . . . . लागल्या लगेच वाचायला कामं करा... स्वयंपाक करा... मुलांचा अभ्यास घ्या... नवरा सुधारत नसतो. 🤣😂🤣😂🤣😂😜😜

नवरा- बायकोच्या जोरदार भांडणानंतर खूप चिडलेला नवरा रागाने घराबाहेर जायला निघतो. ................. .💏💏💏💏💏💏................... बायको ओरडते - "कुठे चाललात मैदान सोडून ?" नवरा - जीव द्यायला. बायको - जीव द्यायचा प्लॅन कॅन्सल झाला तर , येतांना कांदे आणि तुरीची डाळ घेऊन या. "डाळकांदा कर" असं दोन दिवस झाले ओरडताय . वरील भांडणातील विनोदाचा भाग सोडला तर भारतीय नवराबायकोच्या अतूट नात्याचं आणि खंबीर विवाह संस्थेचे दर्शन होते. कारण बायकोला शंभर टक्के खात्रीअसते की, आपला प्रेमळ नवरा आपणाला आणि आपल्या लेकरांना सोडून कुठेही जाणार नाही. पण त्याचवेळी, आपल्या पतीने खरेच जीव दिला तर ? अशी शंकाही तिला घाबरून सोडते आणि त्यासाठी त्याच्या चिडलेल्या मनावर फुंकर घालण्यासाठी - "तुमच्या आवडीचा डाळकांदा करणार आहे लवकर परत या" असे लटक्या रागात सुचवते. ही ताकत आहे आपल्या भारतीय संस्काराची, संस्कृतीची आणि मजबूत विवाह संस्थेची . कितीही रागवला तरी मायेन तोच जवळ घेतो… कधी रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात .. मनातले भाव त्याला डोळ्यातूनच कळतात .. किती दुःखी असला तरी सारं गिळून घेतो. कोण आहे तिला आपल्या शिवाय म्हणून एक गजरा घेऊन येतो … नवरा तो नवराच असतो…. . काळजी का करतेस ? मी आहे न तुला. म्हणून किती धीर देतो. सा-या अडचणी आपल्या मनात ठेऊन बायकोकडे हास-या नजरेन पाहतो… . जसं घरावर छत असतं, तसंच आपल्या डोक्यावर नव-याचं झाकण असतं. किती सुरक्षित असतो आपण त्यांच्या सावलीत … ऊन्हाचे चटके तो खातो, पण सावली आपल्या डोक्यावर देतो.. नवरा तो नवराच असतो…. . आपण चार अलंकार घालून म्हणतो "मान माझी मंगळसुत्र तुझं, कपाळ माझं बिंदी तुझ्या नावाची .." तो कधी म्हणतो का ? "कष्ट माझे पगार तुझा… शरीर माझं आयुष्य तुझं ….. जन्म आईच्या उदरात, पडलो तुझ्या पदरात .. तू जीवन संगिनी म्हणून गोड मानत असतो …. नवरा शेवटी नवराच असतो… . संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो. त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो…. एक चाक डगमगलं तर एका चाकावर रथ हाकणं फार अवघड होतं. . बायकोशिवाय घराला घरपण नाही, तसंच नव-याशिवाय बायको पूर्ण नाही. तो कळस आहे घराचा, छत आहे परिवाराचा… चटके तो खातो आपण मात्र सावलीत राहतो नवरा तो नवराच असतो .. . आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील पण नव-याची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही….. म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या, प्रेमाची साथ द्या. जीवन क्षणभंगूर आहे जगण्याचा आनंद घ्या…. . ❣ आवडल्यास आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला टॅग करा.... आणि लग्नच नसेल झालं तर वाचून आनंद घ्या कारण तुम्हाला हे दिवस पण येणारच आहेत ना.....

बायको : तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत?
नवरा: वैतागून आता काय झालं? काय केलं मी?
बायको : काल तुम्ही जे सिलेंडर लावलं होत ना...
*नवरा* :*हो* "काय झालं मग? "बायको* :*काय माहित कसं लावलं आहे काल पासून २ वेळा दूध उतु गेलं आहे..... 😀😝😁😝😝😱😝😳😳😝

लग्नानंतर बायका आपल्या नवऱ्याला कश्या हाका मारतात बघा... पहिले वर्ष: अहो...!
दुसरे वर्ष: अहो ऐकलंत का?
तिसरे वर्ष: अहो... बंटीचे बाबा..! चौथे वर्ष: अहो बहीरे झालात काय?
पाचवे वर्ष: कान फुटलेत की काय तुमचे!
सहावे वर्ष: इकडे येताय की मी येऊ तिकडे?
सातवे वर्ष: कुठे उलथलाय हा माणूस देव जाणे! 😝😝😜🤣🤣🙄😝🙄😝

पतीचे डोके दाबून देत असताना, पत्नीने हळूवारपणे विचारले "लग्नापूर्वी तुमचे डोके कोण दाबून देत होतं ?" पतीने साधेच पण.... हृदयस्पर्शी उत्तर दिले "लग्नापूर्वी डोकेदुखीच नव्हती" 😂😂😂😂😂😂

Comments

Popular posts from this blog

मराठी मध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जोक्स | Girlfriend Boyfriend Jokes in Marathi

पुणेरी जोक्स आणि पाट्या | Puneri Jokes, Patya