पुणेरी जोक्स आणि पाट्या | Puneri Jokes, Patya

 1) पितृपक्ष स्पेशल..


एक छोटीशी मुलगी आजीला विचारते:

"आजी, roj आपल्या ghari ek bai ani manus रात्री एकत्र yetat आणि sakali gayab होतात...

ते कोण आहेत??


आजी- "हे ईश्वरा, तू त्यांना बघितलंस वाटतं...

.

.

.

ते दोघं तुझे आई बाबा आहेत....

.

जे खूप वर्षांपासून ......

.

.

.

हिंजवडीत जॉब करतात.... 


2) कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत.


नंतर तक्रार चालणार नाही.

(लहान size: ४६ fries, मध्यम size : २७ fries, मोठा: १७ fries) 


3) टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये.


हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे. 


4) T.V. chalu ठेवायचा किंवा nahi ha निर्णय व्यवस्थापनाचा ahe.


tari बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग karun kase वगैरे विंचरू nayet. 


5) दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील.


नंतर ज्यादा आकार पडेल. 


6) सैराट पिक्चर बघून गण्या घरी गेला…


ghari jaun baghto tar , मेव्हणा चहा pit बसलेला hota…

गण्या दारातूनच पळून गेला. 


7) शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात.


पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो – आकर्षक साडी सेल.


तिसरा दुकानदार पाटी लावतो – जबरदस्त साडी सेल.


मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो .............

.

.

.

.

मुख्य प्रवेशद्वार.. 


8) एक कर्मचारी आपला बॉस पगार वाढवत नसल्याने खूपच वैतागला होता.


वेगवेगळ्या युक्त्या वापरुन पहिल्या,

पण काहीच उपयोग झाला नाही.


शेवटी तो बॉसला म्हणाला,

"हे paha saheb, ata jar tumhi maza पगार वाढवला nahit.

तर मी ऑफिसातल्या सगळ्या लोकांना सांगीन की तुम्ही माझा पगार वाढवलात म्हणून." 


9) संगणक अभियंता असलेल्या नवरा बायको मध्ये आपल्या मुलांसमोर वाद होत असतो.

नवरा : अग्ग माझे फक्त तुझ्यावरच प्रेम आहे.


बायको : छे, तुम्ही माझ्यावर कधीच मनापासून प्रेम केले नाही.


नवरा : (मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन )

मग यांना काय मी गुगलवर सर्च करून आणलेत काय ? 


10) मूल जन्मल्यापासून ते अठरा महिन्याचं होईपर्यंत

पालक त्याच्या सतत मागे लागलेले असतात.


'उभं रहा आणि जरा बोलायला शिक'


आणि त्यानंतर तेच मूल अठरा वर्षाचं होईपर्यंत तेच पालक म्हणतात,


'खाली बस आणि जरा ऐकायला शिक' 


11) एका टीनएजरच्या रूमच्या दारावरची पाटी

'चांगल्या भविष्यासाठी चांगली स्वप्नं बघायला हवीत.


म्हणूनच... पुरेशी झोप घ्यायला हवी. गुड नाइट!' 


12) भयंकर पी जे


१ बे रोजगार मुलगा होता,

त्याने गुलाबाचे फूल फ्रीजर मध्ये ठेवले,


आणि मग दुसर्या दिवशी ...

त्याला "रोज-गार" मिळाला !!! 


13) काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात...

(पेट्रोल - ८८ रु बघतात)


पम्पवाला: कितीच टाकू?


काका: १० रुपयांचा शिपड फक्त गाडीवर, बाहेर नेउन पेटवतो... 


14) कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?


कारण वाटेत नळ स्टॉप आहे. 


15) जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?


घड्याळ दुरुस्त करण्याची ! 


16) एअरटेल 4G वाली मुलगी गेली पुण्यात जोशी काकूंच्या घरी....


आणि म्हणाली " mazya aadhi download karun दाखवा ani,

मोबाईल बील फ्री फाँर लाईफटाईम"


काकू म्हणाल्या,

तु माझ्या आधी वरण भाताचा कुकर लावुन दाखव,

तुझं बील मी भरते फाँर लाफफटाईम..


कसल्या डाऊनलोडच्या स्पर्धा लावताय,

साधा स्वयंपाक येत नाही.

tumha हल्लीच्या mulina.. kay आयुष्यभर downloadch करत basnar ka ?


अशी झापलीये त्या कोमल नाजुक मुलीला हो..

पोरगी रडतेयं अजुन...ते पण 4G स्पीड मधे. 


17) भाडेकरू:- अहो मालक घरी उंदीर खूप नाचतात हो ...!


घरमालक:- अरे....१५०० रुपये भाड्याच्या खोलीत

मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का ? 


18) हेल्मेट घालूनही आस्ट्रेलियन खेळाडूचा म्रृत्यू झाल्यामुळे

हेल्मेट कंपन्या खोटारड्या आहेत हे सिद्ध होते. म्हणून आम्ही हेल्मेट घालणार नाही.

.

.

.

.

.

.

.

समस्त बेशिस्त पुणेकर....MH-12 


19) अब कि बार

कुणाचेही असो सरकार


पण बेल वाजवू नका १ ते ४

इथे दुपारी झोपतो मतदार. 


20) ज्ञानेश्वरीवर खास पुणेरी comment....


"वयाच्या मानाने बरं लिहीलय...!" 


puneri jokes in marathi | puneri patya jokes |


21) पुणेरी PJ चा कहर आहे रे बाबा...!!!!


हनी सिंग च्या मोठ्या भावाचं नाव काय..??

"ज्येष्ठ मध.." 


22) "ekda ek मुलगी rakhi पौर्णिमेला राख्या gheun

कॉलेजमध्ये आली..तशी 7 ,8 मुले गैरहजर

होती बाकीची तिला पाहून पसार झालि.


पण एक स्मार्ट होता. तो तसाचबाकावर बसून राहिला.

... ती त्याच्याकडे गेली आणि म्हणाली हात दे राखी बांधायची आहे तुला.


तर हे साहेब म्हणाले मुळीच नाही.

ती म्हणाली का? का नाही?

हा म्हणाला वा ग वा शहाणीच आहे की तू!


.

मी उद्या मंगळसूत्र आणतो तू घेशील का बांधून... 


23) जी पुणेरी स्त्री एक जोडीदार सात जन्म मिळावा

म्हणून पूजा करते ती "वट सावित्री"


आणि

जी स्त्री एका जन्मात सात जोडीदार मिळावे म्हणून

पूजा करते ती? "चा-वट सावित्री" 


24) आज सगळ्या पुणेरी Ladies उपवास करणार,

वडाला फेर्या मारणार आणी म्हणणार ..............


वड़ापाव ....!!! वड़ापाव .....!!! 


25) एक काळा माणुस मरतो आणि र्स्वगात जातो !

पुणेरी अप्सरा:" कोण आहे तु ??


माणुस: मी HERO आहे TITANIC चा..

पुणेरी अप्सरा: "अरे काळ्या Titanic बुडली होती जळाली न्हवती 


 **पुणेरी स्पेशल


26) बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की,

माझा 'बीपी' वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?


नवराः अगं 'बीपी' म्हणजे 'बावळट पणा' 


27) नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो..


नवरा: प्यायला पाणी आण ग?

बायको: तहान लागली आहे का ?

नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे. 


28) पुणेकर: काका ८ समोसे द्या


दुकानदार- पार्सल देऊ ?


पुणेकर- नाही आ करतो कोंबा तोंडात 


29) शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा.


चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये. 


30) उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा.


कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही. 


31) विनाकारण सॉस मागू नये.

टोमाटो फुकट मिळत नाहीत. 32) पुणेरी राँग नंबर


अः देशपांडे आहेत का?

बः (चिडून) पावनखिंड लढवायला गेलेत. काही निरोप?


अः त्यांना म्हणाव, महाराज गडावर पोचले.

मेलात तरी चालेल! 33) पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले.


दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:


"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना,

चितळे उघडले आहेत का.?" 34) पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू?


पुणेरी : २० Number ची पकडा.

पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?


पुणेरी : १० - १० च्या २ पकडा. 35) स्थळ : पुणे


एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!!

मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...?


मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली,

आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.


पुणेरी एकदम तिखट.... 36) भन्नाट पुणेरी


बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?

जोशी काकूः आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय.

तुलापण भूक लागली असेल ना?


बाळूः हो

जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये... 


37) पुणेरी स्पेशल


चिंटूः बाबा मला ब्लॅकबेरी नाही तर अॅप्पल पाहिजे.

बाबाः घरात फणस आणलाय तो संपव आधी...
38) "गायीच्या potat 33 koti dev ahet he

जरी खरे मानले,

तरी येता- jata tichya पोटाला hat laun sarkha नमस्कार karu naye,


तिला गुदगुल्या होतात.." 39) अस्सल पुणेरी


सदाशिव पेठेतली एक लायब्ररी

सभासद: आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ?


ग्रंथपाल: (सभासदाकडे रोखून पहात ) पुस्तक परत कोण आणून देणार ?


puneri jokes marathi  | puneri patya jokes

40) पुणेरी बँकेतला किस्सा


ग्राहक: “aaj check डिपॉंजीट kela tar jama kevha hoil ??”


कारकून:” ३ दिवसांनी”

ग्राहक: “”अहो बँक समोरच तर आहे….

फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे….तरीही एवढा वेळ ??”


कारकून: “अहो ती प्रोसिजर आहे….

समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील

कि रीतसर घरी नेऊन मग जाळतील ??” 41) स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)


पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?

डॉक्टर: ३ लाख रुपये.

.

....

.


पेशंट: (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..?? 42) स्थळ: सदाशिव पेठ, पुणे.


जोशीकाका: kay tatya, aaj अगदी आनंदात dista आहात ! kaay झालं ?


तात्या: अहो, amchya शेजारच्या कुलकर्ण्यांना १ lakh रुपयाची लॉटरी लागलीये!


जोशीकाका: मग तुम्हाला का इतका आनंद झालाये?


तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीये ! 43) पुणेरी boyfriend


मुलगा: I'll climb the tallest mountain, swim the deepest sea,

walk on fire just for you.

मुलगी: wow किती romantic...!

तू मला आत्ता भेटायला येशील का?


मुलगा: आत्ता लगेच नको, पाऊस पडतोय, आई ओरडेल...! 44) एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला,


" थांबा मी चहा घेऊन आलो..."


. १० मिनीटांनी,

" chala maza चहा gheun zala aapan aata jauya ...!" 45) एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो,


तो nurse ला विचारतो, खायला काय आहे?

nurse : पोहे आणि उपीट तयार आहे...


मुलगा: च्या आईला! परत पुण्यात जन्माला आलो....!! 46) पुणेरी: ओ दुकानदार, केळी कशी दिली राव?


दुकानदार : एक रुपयाला एक

पुणेरी : काय तरी काय. साठ पैशाला देता का बोला....


दुकानदार : अहो साठ पैशात तर त्याचं साल फक्त येईल.

पुणेरी : ठीक आहे. मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवायचं केळं द्या पाहू. 47) एका पुणेरी मिठाई दुकानावरील पाटी..


"इथे तुम्हाला - तुमच्या मेहुणीपेक्षा गोड ...

आणि बायकोपेक्षा तिखट पदार्थ मिळतील....." 

Comments

Popular posts from this blog

मराठी मध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जोक्स | Girlfriend Boyfriend Jokes in Marathi